विशाखापट्टणम -आयपीएलमध्ये आज दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळल्या गेलेल्या एलिमिनेटर सामन्यात दिल्लीने विजय मिळवत क्वॉलिफायर-२ सामन्यासाठी आपली पात्राता सिद्ध केली आहे. मात्र या पराभवामुळे सनरायझर्सचे आयपीएलमधील आव्हान संपुष्टात आले आहे. हैदराबादने विजयासाठी दिलेल्या १६३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीने पृथ्वी शॉच्या ५६ आणि रिषभ पंतच्या दमदार ४९ धावांच्या जोरावर १९.५ षटकांमध्ये २ विकेट राखून विजय मिळवत आयपीएलमधील आपले आव्हान कायम ठेवले आहे.
रोमहर्षक 'एलिमिनेटर' सामन्यात दिल्लीचा विजय, हैदराबाद विजेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर - Eliminator
हैदराबादने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीने पृथ्वी शॉच्या ५६ आणि रिषभ पंतच्या दमदार ४९ धावांच्या जोरावर २ विकेट राखून विजय मिळवत आयपीएलमधील आपले आव्हान कायम ठेवले आहे
क्वालिफायर-२ सामन्यात आता दिल्लीचा सामना चेन्नई सुपर किंग्जशी होणार असून, या सामन्यात विजय मिळवणारा संघ जेतेपदासाठी अंतिम फेरीत मुंबई इंडियन्सशी भिडेल. क्वालिफायर-२ सामना १० मे'ला विशाखापट्टणम येथील डॉ. वाय. एस. राजशेखर रेड्डी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
हैदराबादसाठी मार्टिन गुप्टिलने ३६, मनीष पांडेने ३० कर्णधार केन विल्यम्सनने २८ धावा करत दिल्ली कॅपिटल्सपुढे १६३ धावांचे आव्हान ठेवले होते. दिल्लीकडून गोलंदाजीत किमो पॉलने सर्वाधिक ३, इशांत शर्माने २ तर ट्रेंट बोल्ट, अमित मिश्रा यांनी प्रत्येकी १ विकेट घेतला.