मुंबई - दिल्ली कॅपिटल्सने कोलकाता नाइट रायडर्सचा १८ धावांनी पराभव करत गुणातालिकेत अव्वलस्थान काबिज केले. केकेआरची या पराभवामुळे पाचव्या स्थानावर घसरण झाली. केकेआरने चार सामने खेळली असून यात दोन विजय तर दोन पराभव आहेत. केकेआरच्या पराभवानंतर कर्णधार दिनेश कार्तिकवर टीका करण्यात येत आहे. तर, कार्तिकची कर्णधारपदावरून हकालपट्टी करत त्या ठिकाणी इयॉन मॉर्गनची निवड केकेआरने केली पाहिजे, असे भारताच्या वेगवान गोलंदाजानेम्हटले आहे.
केकेआरच्या पराभवानंतर भारताचा वेगवान गोलंदाज एस. श्रीसंतने सांगितले की, दिनेश कार्तिकने आयपीएल २०२०मध्ये केकेआर संघाचे नेतृत्व करू नये. कार्तिकच्या ठिकाणी मॉर्गनला संधी मिळायला हवी. या संदर्भात श्रीसंतने एक ट्विट केले आहे. इयॉन मॉर्गनने केकेआरचे कर्णधारपद भूषवावे. कारण तो विश्वविजेता संघाचा कर्णधार आहे. मला आशा आहे की, केकेआर या समस्येकडे लक्ष्य देईल. त्यांना अशा कर्णधाराची गरज आहे जो संघाला स्वत: पुढे येऊन उभारी देईल. जसे धोनी आणि विराट कोहली करतात, असे श्रीसंतने त्याच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.