साउथम्प्टन -बुधवारी जाहीर झालेल्या आयसीसी टी-२० क्रमवारीत इंग्लंडचा फलंदाज डेव्हिड मलानने अव्वल स्थान मिळवले आहे. त्याने पाकिस्तानच्या बाबर आझमला मागे टाकत ही कामगिरी केली. मलानने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेमध्ये शानदार पदार्पण केले होते.
३३ वर्षीय मलान याआधी पाचव्या स्थानावर होता. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत १२९ धावा केल्या. मलानने आतापर्यंत १६ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून ४८.७१च्या सरासरीने ६८२ धावा केल्या आहेत. यात एका नाबाद शतकाचाही समावेश आहे. जेसन रॉय आणि बेन स्टोक्सच्या अनुपस्थितीत मलानला पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाविरूद्ध खेळण्याची संधी मिळाली.