दुबई -आयसीसीने टी-२० फलंदाजांची क्रमवारी जाहीर केली आहे. यात इंग्लंडचा फलंदाज डेविड मलानने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला मागे सारत अव्वलस्थान काबिज केले आहे. मलान टी-२० क्रमवारीत सर्वोच्च स्थान प्राप्त केले आहे.
आयसीसी टी-२० फलंदाजांच्या क्रमवारीत बाबर आझम पहिल्या स्थानावर होता. त्याला मलानने धक्का दिला आणि पहिले स्थान काबिज केले. मलान ८७७ रेटींग पॉईंटस पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. तर बाबर आझम ८६९ रेटींग पॉईंटस दुसऱ्या स्थानावर घसरला आहे.
तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरणाऱ्या मलानने आतापर्यंत फक्त १६ आंतरराष्ट्रीय सामने खेळली आहे. यात त्याने ४८.७१ च्या सरासरीने ६८२ धावा केल्या आहेत. यात एक शतकाचा समावेश आहे.