सिडनी - डेव्हिड वॉर्नरची यूएईमध्ये पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघात निवड करण्यात आलेली नाही. नुकतेच त्याने क्लब क्रिकेट खेळताना शतक झळकावले. वॉर्नरच्या हाताच्या कोपऱ्याची शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर त्याने क्रिकेटमध्ये पुनरागमन केल्याचे बोलले जात आहे.
वॉर्नरने सिडनीतील क्लबकडून खेळताना ७७ चेंडूत ११० धावांची खेळी केली होती. त्यात ७ षटकार आणि ४ चौकारांचा समावेश होता. वॉर्नरच्या खेळीनंतरही त्याच्या रेंडविक संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. वॉर्नरला १८ वर्षांच्या हेनरी रेल्जने झेलबाद केले.