मेलबर्न- कोरोना विषाणूचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने उपाययोजना करत आहे. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरही आपल्या मुलीली कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळे तो आपल्या ५ वर्षीय मुलीला कोरोनापासून दूर राहण्याचे धडे देत आहे. याचा व्हिडिओ वॉर्नरने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर केला आहे.
वॉर्नर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये, तो मुलीला हात धुण्याचा सल्ला देत आहे. यासोबत तो आपण सावधगिरी बाळगली पाहिजे, असेही मुलीला सांगत आहे. वॉर्नरची मुलगी या व्हिडीओमध्ये सॅनिटायझर वापरताना दिसत आहे. त्यावर वॉर्नर मुलीला विचारतो, तु हात का धूत आहेस?. यावर मुलीने विषाणूला मारण्यासाठी, असे निरागसणे उत्तर दिले.
दरम्यान, वॉर्नरने या व्हिडीओला आम्ही मुलींना हात धुण्यासाठी जागरूक करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत. हा आपल्या रोजच्या रोजचा भाग असावा, असे कॅप्शन दिले आहे.