नवी दिल्ली - क्रिकेटपासून दूर असलेला ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नर पुन्हा एकदा नव्या व्हिडिओमुळे चर्चेचा विषय ठरला आहे. या नव्या व्हिडिओमध्ये वॉर्नर आता हिट फिल्म बाहुबलीचा योद्धा म्हणून समोर आला आहे. त्याचा हा लुक पाहून टिकटॉकवरील त्याचे चाहते खूप उत्सुक झाले आहेत.
या नव्या व्हिडिओमध्ये तो आणि त्याची मुलगी दिसत आहे. वॉर्नरची मुलगी अमरेंद्र बाहुबलीचा जयघोष करत आहे. लॉकडाऊन काळात वॉर्नर टिकटॉकवर प्रचंड अॅक्टिव्ह झाला आहे. कोरोनामुळे सर्व क्रीडा स्पर्धा स्थगित झाल्यामुळे वॉर्नरसह अनेक खेळाडू आपल्या घरीच वेळ घालवत आहेत.