मुंबई- कोरोनामुळे देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यामुळे घरात असलेल्या भारताचा डावखुरा सलामीवीर शिखर धवनला तिची पत्नी आयेशाने धुणी-भांडी करण्यासं लावलं. एवढेच नव्हे तर शिखरला टॉयलेटही स्वच्छ करावं लागलं. याचा व्हिडिओ शिखरने आपल्या सोशल मीडियावरुन अकाउंटवरुन शेअर केला होता. शिखरची ही अवस्था पाहून भारताची फुलराणी सायना नेहवाल हिच्यासह ऑस्ट्रेलियाचा फलंदाज डेव्हिड वॉर्नर, अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी, पाकिस्तानचा शोएब मलिक आणि सनरायझर्स हैदराबादचा श्रीवत्स गोस्वामी यांनी त्याचं सांत्वन केलं आहे.
काय आहे शिखरने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये -
शिखरने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, तिची बायको आयेशा ही आरशासमोर मेकअप करताना दिसत आहे. तर शिखर हा बाथटबमध्ये बसून कपडे धूत आहे. याशिवाय शिखर घरातील कमोड साफ करताना दिसत आहे. या व्हिडिओच्या बॅकग्राऊडला 'जब से हुई है शादी, आफत गले पडी है, गाणे वाजत आहे. या व्हिडिओला त्याने 'एक आठवडा घरी थांबल्यानंतर ही अवस्था.. झाल्याचे, मजेशीर कॅप्शन दिलं आहे.