टाँटन - विश्वकरंडक स्पर्धेत बुधवारी खेळण्यात आलेला ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात कांगारूंनी ४१ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात डेव्हिड वॉर्नरने केलेल्या १०७ धावांच्या शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ३०७ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकचा संघ २६६ धावांवर गारद झाल्याने ऑस्ट्रेलिया संघ ४१ धावांनी विजयी झाला.
AUS VS PAK : लहानग्या चाहत्याला डेव्हिड वॉर्नरने दिला सामनावीरचा पुरस्कार - icc
पाकिस्तानविरुद्ध ऑस्ट्रेलियाकडून १०७ धावांची दमदार खेळी करणाऱ्या डेव्हिड वॉर्नरला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला होता.
![AUS VS PAK : लहानग्या चाहत्याला डेव्हिड वॉर्नरने दिला सामनावीरचा पुरस्कार](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3547976-171-3547976-1560414018498.jpg)
लहानग्या चाहत्याला डेव्हिड वॉर्नरने दिला सामनावीरचा पुरस्कार
या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून १०७ धावांची दमदार खेळी करणाऱ्या डेव्हिड वॉर्नरला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. मात्र, वॉर्नरने हा पुरस्कार आपल्या एका लहानग्या चाहत्याला भेट दिला. सामना संपल्यानंतर स्वत: वॉर्नरने चाहत्यांच्या गराड्यात जात हा पुरस्कार आपल्या चाहत्याच्या हातात सोपवला. वॉर्नरचा हा व्हिडिओ आयसीसीने आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे.