मुंबई -ऑस्ट्रेलियाचा टिकटॉक स्टार क्रिकेटर डेव्हिड वॉर्नरने अंगणात 'शॅडो प्रॅक्टिस' करून कंटाळलो असल्याचे म्हटले आहे. वॉर्नरने ऑस्ट्रेलियाची जर्सी घालून इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये त्याने आपले मत मांडले.
''ठीक आहे, माझं सर्व झालं आहे. आपण पुन्हा कधीपासून सुरुवात करू शकतो. मला या 'शॅडो प्रॅक्टिसचा' कंटाळा आला आहे", असे वॉर्नरने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये सांगितले.
कोरोनामुळे ऑस्ट्रेलियात लॉकडाऊन सुरू आहे. यामुळे घरी असलेला डेव्हिड वॉर्नर तेलुगू, तमिळ, पंजाबी आणि हिंदी गाण्यावर व्हिडिओ बनवत आहे. त्याचे हे व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर चांगलेच लोकप्रिय ठरत आहेत. वॉर्नरला या कामी त्याची पत्नी कँडीस आणि मुले मदत करतात. नुकताच वॉर्नरचा बाला डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.
कोरोनामुळे सर्व प्रकारचे क्रिकेट उपक्रम थांबवण्यात आले आहेत. बीसीसीआयने आयपीएलचा तेरावा हंगाम तहकूब केला आहे.