मुंबई- ऑस्ट्रेलियाचा टिकटॉक स्टार क्रिकेटर डेव्हिड वॉर्नरने एक व्हिडिओ बनवला आहे. हा व्हिडिओ पाहून भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीलाही हसू आवरले नाही. त्याने वॉर्नरच्या व्हिडिओवर कमेंट करताना हसणाऱ्या ईमोजींचा वापर केला आहे.
कोरोनामुळे ऑस्ट्रेलियात लॉकडाऊन सुरू आहे. यामुळे घरी असलेला डेव्हिड वॉर्नर तेलुगू, तमिळ, पंजाबी आणि हिंदी गाण्यावर व्हिडिओ बनवत आहे. त्याचे हे व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर चांगलेच लोकप्रिय ठरत आहेत. वॉर्नरला या कामी त्याची पत्नी कँडीस आणि मुलं मदत करतात. आता वॉर्नरचा बाला डान्सचा व्हिडिओ सद्या व्हायरल होत आहे.
वॉर्नरने बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारच्या प्रसिद्ध गाण्यावर एक व्हिडिओ बनवला आहे. त्याने कोट घालून अक्षयच्या 'हाऊसफूल-४' सिनेमातील 'बाला' या गाण्यावर डान्स केला आहे. त्याने हा व्हिडिओ आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे.