कोलकाता - सनरायजर्स हैदराबादचा सलामीचा फलंदाज डेव्हिड वॉर्नर याने आयपीएलमध्ये पुनरागमन गाजविले. पहिल्याच सामन्यात त्याने कोलकाताविरुद्ध खेळताना ५३ चेंडूत ८५ धावांची तुफानी खेळी केली. त्यात ९ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. याचसोबत आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक अर्धशतके झळकाविण्याचा पराक्रम केला.
वॉर्नरच्या नावावर ३७ अर्धशतकांची नोंद झाली. त्याने या विक्रमाबाबत गौतम गंभीरला पाठीमागे टाकले. गौतमच्या नावावर १५४ सामन्यांत ३६ अर्धशतकाची नोंद आहे. या सामन्यापूर्वी अर्धशतकांच्या बाबतीत बरोबरीत होती. वॉर्नरने आज तुफानी अर्धशतक ठोकत हा विक्रम केला. तसेच पहिल्या गड्यासाठी त्याने इंग्लंडच्या जॉनी बेयस्टोसोबत ११८ धावांची मोठी भागीदारी केली.
वॉर्नरने या खेळीसह त्याने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे. त्याने केकेआरविरुद्ध ७६२ पटकावल्या आहेत. रोहित शर्माने केकेआरविरुद्ध ७५७ धावा कुटल्या आहेत.