लंडन -इंग्लंडचे माजी कर्णधार डेव्हिड गोव्हर यांनी सौरव गांगुलीचे कौतुक करत त्याच्याकडे आयसीसीचे नेतृत्त्व करण्याची क्षमता असल्याचे म्हटले आहे. ट्विटरवर चाहत्यांशी संवाद साधताना गोव्हर यांनी ही प्रतिक्रिया दिली.
''सौरव गांगुलीकडे आयसीसीचे नेतृत्त्व करण्याची क्षमता''
इंग्लंडचे माजी कर्णधार डेव्हिड गोव्हर यांंनी ट्विटरवर ही प्रतिक्रिया दिली. गोव्हर म्हणाले, "मी तुम्हाला सौरवबद्दल काय सांगू. मी त्याच्याशी बर्याच वेळा बोललो आहे. तो नक्कीच एक उत्तम खेळाडू होता आणि त्याचे विक्रम त्याची कहाणी सांगतात. गेल्या काही वर्षात मला काही गोष्टी समजल्या आहेत. आपल्याला बीसीसीआय चालवायचे असेल तर आपल्याला सर्वकाही आवश्यक आहे.''
गोव्हर म्हणाले, "मी तुम्हाला सौरवबद्दल काय सांगू. मी त्याच्याशी बर्याच वेळा बोललो आहे. तो नक्कीच एक उत्तम खेळाडू होता आणि त्याचे विक्रम त्याची कहाणी सांगतात. गेल्या काही वर्षात मला काही गोष्टी समजल्या आहेत. आपल्याला बीसीसीआय चालवायचे असेल तर आपल्याला सर्वकाही आवश्यक आहे. त्याच वेळी तुम्ही एक कुशल राजकारणी असायला हवे. बर्याच गोष्टींवर नियंत्रण ठेवता आले पाहिजे."
आयसीसीचे अध्यक्ष होण्याची गांगुलीची शक्यता जास्त असल्याचे गोव्हर यांना वाटते. ते पुढे म्हणाले, "मला वाटते की तो एक महान व्यक्ती आहे आणि त्याच्याकडे चांगली राजकीय कौशल्ये आहेत. त्याच्याकडे योग्य दृष्टीकोन आहे. त्यामुळे तुम्ही चांगली कामे करू शकता. प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर, बीसीसीआय चालवणे खूप अवघड आहे. आयसीसीचा बहुमान मिळवणेसुद्ध कठीण आहे. या मंडळासोबत खूप काही केले जाऊ शकते.''