केपटाऊन -दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज वेगवान गोलंदाज डेल स्टेनच्या घरात तीन वेळा चोरीचा प्रयत्न करण्यात आला आहे. स्टेनने ट्विटरवरून ही माहिती दिली. तिसऱ्या प्रयत्नात आई घाबरली असल्याचे स्टेनने सांगितले.
ट्विटरवर स्टेन म्हणाला, "शुक्रवारपासून माझ्या घरात तीनवेळा चोरीचा प्रयत्न करण्यात आला. काल त्यांनी माझ्या मित्राची कार नष्ट केली आणि आज रात्री त्यांनी माझ्या आईला खूप घाबरवले. ती घरात एकटी होती.''