केपटाऊन -दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी वेगवान गोलंदाज डेल स्टेनला यंदा टी-20 विश्वकरंडक स्पर्धेच्या आयोजनाबाबत विश्वास वाटत नाही. यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये टी-20 विश्वकरंडक स्पर्धा ऑस्ट्रेलियामध्ये होणार आहे, परंतु कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे या स्पर्धेवर टांगती तलवार आहे.
यंदाच्या वर्ल्डकप स्पर्धेबाबत स्टेन संभ्रमात - dale steyn latest news
स्टेनला ट्विटरवर एका चाहत्याने प्रश्न विचारला होता. तेव्हा त्याने हे उत्तर दिले. आपल्या क्रिकेटच्या कारकीर्दीत असणाऱ्या सर्वोत्कृष्ट फलंदाजांचीही नावेही त्याने दिली. सर्व उत्तम होते. पाँटिंग 'प्राईम' होता. सचिन एका भिंतीसारखा होता. द्रविड, गेल, पीटरसन सर्व शानदार होते, असे स्टेन म्हणाला.

यंदाच्या वर्ल्डकप स्पर्धेबाबत स्टेन संभ्रमात
स्टेनला ट्विटरवर एका चाहत्याने प्रश्न विचारला होता. तेव्हा त्याने हे उत्तर दिले. आपल्या क्रिकेटच्या कारकीर्दीत असणाऱ्या सर्वोत्कृष्ट फलंदाजांचीही नावेही त्याने दिली. सर्व उत्तम होते. पाँटिंग 'प्राईम' होता. सचिन एका भिंतीसारखा होता. द्रविड, गेल, पीटरसन सर्व शानदार होते, असे स्टेन म्हणाला.
स्टेनने त्याच्या सर्वोत्तम कसोटी स्पेलचे वर्णन केले. त्याने नागपुरात भारताविरुद्ध घेतलेले सात बळी व वँडर्समधील पाकिस्तानविरुद्धचे सहा बळी ही सर्वोत्तम कामगिरी असल्याचे स्टेन म्हणााला आहे.