मेलबर्न - क्रिकेटच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज गोलंदाज डेल स्टेन यंदाच्या बिग बॅशमध्ये (बीबीएल) खेळताना दिसणार आहे. या स्पर्धेत तो मेलबर्न स्टार्स संघाकडून खेळणार आहे. ऑगस्टमध्ये स्टेनने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.
खुशखबर!..डेल स्टेन करणार पुनरागमन - dale steyn and melbourne stars
स्टेन बिग बॅशमध्ये एकूण सहा सामने खेळणार असून दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने त्याला सहा सामने खेळण्याची परवानगी दिली आहे. 'फेब्रुवारीत इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी स्टेनला संधी मिळाली नाही तर, मी बीबीएलमध्ये खेळणे चालू ठेवेन', असे स्टेनने म्हटले आहे.

बिग बॅशमध्ये स्टेन पहिल्यांदा खेळणार असून चाहत्यांना स्टेनगनची जादू पाहायला मिळणार आहे. स्टेनपूर्वी एबी डिव्हिलीयर्स आणि ख्रिस मॉरिस यांनी बीबीएलमध्ये भाग घेतला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये आफ्रिका संघासाठी स्टेनने सर्वाधिक बळी टिपले असून त्याच्या नावावर कसोटीत ४३९ बळी आहेत. दुखापतींची साडेसाती मागे लागल्याने त्याने कसोटीतून निवृत्ती घेतली होती.