जोहान्सबर्ग -दक्षिण आफ्रिकेचा संघ आगामी क्रिकेट मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकला कर्णधारपद देण्यात आले, तर, वेगवान गोलंदाज डेल स्टेनला मात्र या संघातून वगळण्यात आले आहे.
गोलंदाज डेल स्टेनने विराट कोहलीची मागितली माफी, कारण.. - माफी
संघात निवड न झाल्याबद्दल स्टेन निराश झाला असून त्याने ट्विटरवर निवड समितीला टोमणे मारले आहेत. 'कोचिंग स्टाफच्या अदलाबदलीमध्ये ते माझा नंबर विसरुन गेले', असा टोला स्टेनने लगावला आहे.
संघात निवड न झाल्याबद्दल स्टेन निराश झाला असून त्याने ट्विटरवर निवड समितीला टोमणे मारले आहेत. 'कोचिंग स्टाफच्या अदलाबदलीमध्ये ते माझा नंबर विसरुन गेले', असा टोला स्टेनने लगावला आहे. या मालिकेसाठी निवड न झाल्याने विराट आणि त्याच्या चाहत्यांची स्टेनने माफी मागितली आहे.
दक्षिण आफ्रिकेचा सर्वात यशस्वी गोलंदाज म्हणून डेल स्टेनची ओळख आहे. त्याने नुकताच कसोटी क्रिकेटला रामराम ठोकला आहे. भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी फाफ डु प्लेसिसला कर्णधारपदावरुन हटवले गेले आहे.
टी-20 चा संघ -क्विंटन डी कॉक (कर्णधार), रासी वॅनडर डुसेन, टेम्बा बवुमा, ज्युनियर डाला, बजोर्न फॉर्टयुइन, ब्यूरन हेंड्रिक्स, रीझा हेंड्रिक्स, डेव्हिड मिलर, एन्रिक नोर्टजे, अँडिले फेहुलक्वायो, ड्वेन प्रीटोरियस, कागिसो रबाडा, तबरेज शम्सी, जोन-जोन स्मुट्स.
कसोटी संघ -फाफ डु प्लेसिस (कर्णधार), टेम्बा बावुमा (उप-कर्णधार), थेयुनिस डी ब्रूयन, क्विंटन डी कॉक, झुबेर हमजा, केशव महाराज, एडन मार्करम, सेनुराह मुथुसामी, लुंगी एनगिडी, एनरिक नोर्टजे, वेर्नॉन फिलेंडर, डेन पिएड्ट, कागिसो रबाडा, रूडी सेकेंड.