महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृह नुतनीकृत खेळपट्टीचा उद्घाटन सोहळा संपन्न - क्रिकेट

दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृह नुतनीकृत खेळपट्टीचे उद्घाटन राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या मराठी कलाकारांच्या ‘महाराष्ट्र क्रिकेट लीगच्या’ पहिल्या सामन्याला मान्यवरांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. दादोजी

यरागा

By

Published : Feb 2, 2019, 12:00 AM IST

ठाणे- आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मानांकनावर आधारित तयार करण्यात आलेल्या दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृह नुतनीकृत खेळपट्टीचे उद्घाटन राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या मराठी कलाकारांच्या ‘महाराष्ट्र क्रिकेट लीगच्या’ पहिल्या सामन्याला मान्यवरांच्या उपस्थितीत सुरुवात झाली.


दादोजी कोंडदेव स्टेडियमचे नूतनीकरण करण्यासाठी महापालिका प्रशासनान गेल्या काही वर्षांपासून प्रयत्नशील होते. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या मैदानात रणजी सामने खेळविण्यासाठी आवश्यक असलेली खेळपट्टी आणि मैदान विकसित करण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते. यंदाच्या आयपीएलच्या सामन्यातील काही संघ या मैदानात सराव करणार असून कोलकत्ता नाईट रायडरची टीम पुढच्या आठवड्यात तीन दिवस या मैदानात सराव करणार आहे.


दादोजी कोंडदेव स्टेडियममधील क्रिकेट मैदानासाठी ७० मीटर परिघाची सीमारेषा आखण्यात आली आहे. मैदानात ऑस्ट्रेलियातील बरमुडा गवताचे रोपण करण्यात आले आहे. मैदानात पाण्याची फवारणी करण्यासाठी सध्या मैदानात ७२ भूमिगत फवारे बसविण्यात आले असून पाण्याचा शिडकावा करायचा असेल तेव्हा ते जमिनीतून आपोआप वरती येऊन हवा तितकाच पाणीपुरवठा करतात. मैदानात एक मुख्य खेळपट्टी व सरावासाठी तीन खेळपट्या तयार करण्यात आल्या आहेत. मुख्य खेळपट्टीजवळ तिसऱ्या पंचांसाठी कॅमेरे बसविण्यात आले आहेत.


पहिला सामना मुंबईचे मावळे व बाणेदार ठाणे यांच्यात झाला यामध्ये बाणेदार ठाणे संघ विजयी झाला. दुसऱ्या सामना खतरनाक मुळशी विरुद्ध मीडिया लढावय्या यांच्यात पार पडला. यामध्ये खतरनाक मुळशी संघ विजयी झाला. तर, अंतिम सामना मुंबईचे मावळे व मीडिया लढावय्या यांच्यात झाला. यामध्ये मीडिया लढावय्या संघ विजयी झाला. या ३ सामन्यात मीडिया लढवय्याचा अनिकेत पाटील , बाणेदार ठाणेचा संदीप जुवाटकर, तर खतरनाक मुळशीचा उदय पाटील यांना 'मॅन ऑफ द मॅच' म्हणून पुरस्कार देण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details