नवी दिल्ली - सध्या चालू असलेल्या आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघाचा पुढील सामना इंग्लडविरूद्ध होणार आहे. या सामन्यात भारतीय संघ नव्या जर्सीमध्ये खेळताना दिसणार आहे. ३० जूनला भारताचा सामना इंग्लडशी होणार आहे.
विश्वकरंडक स्पर्धेत भारताची विराटसेना दिसणार 'भगव्या' रंगात, नव्या जर्सीचे अनावरण - new jersey
एएनआयच्या वृत्तानुसार भारताच्या नव्या जर्सीचा रंग हा भगवा असणार आहे
विश्वकरंडक स्पर्धेत भारताची विराटसेना दिसणार 'भगव्या' रंगात, नव्या जर्सीचे अनावरण
एएनआयच्या वृत्तानुसार भारताच्या नव्या जर्सीचा रंग हा भगवा असणार आहे. त्यामुळे इंग्लडविरूद्ध होणाऱ्या सामन्यात भारतीय क्रिकेट संघ भगव्या रंगाच्या जर्सीमध्ये खेळताना क्रिकेटप्रेमींना पाहायला मिळणार आहे.
आयसीसीच्या नियमानुसार विश्वकरंडक स्पर्धेत एका सामन्यात दोन्ही संघांची जर्सी एकाच रंगाची असली तर, दोघांपैकी एका संघाला आपल्या जर्सीच्या रंगात बदल करावा लागतो. त्या नियमानुसार भारतीय संघ इंग्लडविरूद्ध खेळताना भगव्या रंगाच्या जर्सीत दिसणार आहे.
Last Updated : Jun 26, 2019, 6:02 PM IST