मुंबई- चेन्नई सुपर किंग्जचा उपकर्णधार सुरेश रैनापाठोपाठ अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंग यानेही स्पर्धेतून माघार घेतली आहे. यामुळे चेन्नईच्या संघासमोरील अडचणीत वाढ झाली आहे. या संदर्भातील वृत्त पीटीआयने दिलं आहे.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, हरभजनने आयपीएलच्या १३ व्या हंगामात न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने वैयक्तिक कारणास्तव आयपीएलमधून माघार घेतली आहे. दरम्यान, एएनआयला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याने अजून संघ व्यवस्थापनाला अधिकृतपणे याबाबत कळवलेलं नाही.