महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

CSKvsMI : पहिल्या सामन्यात चेन्नईने मारली बाजी, मुंबई इंडियन्सवर ५ गडी राखून विजय

प्रथम फलंदाजी करताना मुंबईने दिलेल्या १६२ धावांचे लक्ष्य पार करताना खराब सुरुवात होऊनही चेन्नईने विजयश्री खेचून आणला. ६ धावांवर २ बाद अशी स्थिती असताना फाफ डू प्लेसिस आणि अंबाती रायडू यांनी डाव सावरला.

csk vs mi first match live in ipl 2020
CSKvsMI LIVE

By

Published : Sep 19, 2020, 7:03 PM IST

Updated : Sep 19, 2020, 11:58 PM IST

अबुधाबी - आयपीएल २०२० च्या पहिल्या टी-२० सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सवर ५ गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने दिलेल्या १६२ धावांचे लक्ष्य पार करताना खराब सुरुवात होऊनही चेन्नईने विजयश्री खेचून आणला. ६ धावांवर २ बाद अशी स्थिती असताना फाफ डू प्लेसिस आणि अंबाती रायडू यांनी डाव सावरला. फाफ डू प्लेसिसने ४४ चेंडूत नाबाद ५८ धावांची खेळी केली तरअंबाती रायडूनेही शानदार ७१ धावांची खेळी केली. त्याने ३ षटकार आणि ६ चौकार लगावले. या दोघांनी केलेल्या शानदार अर्धशतकी खेळीमुळे पहिल्याच सामन्यात चेन्नईने मुंबईला मात दिली.

तत्पूर्वी,सलामीवीर रोहित शर्मा आणि क्विंटन डीकॉक यांनी मुंबईच्या डावाची दमदार सुरुवात केली. रोहितने पहिल्याच चेंडूवर चौकार लगावला. त्याने क्विंटनसह दीपक चहरच्या पहिल्याच षटकात १२ धावा वसूल केल्या. हे दोघे मोठी खेळी करणार असे वाटत असताना, धोनीने पीयुष चावलाला पाचारण केले. अनुभवी चावलानेही आपल्या कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत रोहित शर्माला माघारी धाडले. रोहित १२ धावांवर बाद झाला. त्यानंतर डी कॉकही ३३ धावांवर तंबूत परतला. त्याला सॅम करनने बाद केले.

त्यानंतर सौरभ तिवारीने संघाचा डोलारा सांभाळला. त्याने ३ चौकार आणि एका षटकारासह ४२ धावांचे योगदान दिले. सूर्यकुमारनेही १७ धावा करत त्याला साथ दिली. सौरभ बाद झाल्यावर इतर फलंदाजांना संघासाठी चांगली कामगिरी करता आली नाही. हार्दिक पांड्याने रवींद्र जडेजाला सलग दौन षटकार ठोकले, पण तो मोठी खेळी करण्यास अपयशी ठरला. कृणाल पांड्या, कायरन पोलार्डही संघाच्या धावसंख्येत मोठे योगदान देण्यात कमी पडले. चेन्नईकडून लुंगी एनगिडीने सर्वाधिक तीन, दीपक चहर आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी दोन, तर सॅम करन आणि पीयुष चावलाने प्रत्येकी एक बळी घेतला.

LIVE UPDATE :

  • मुंबई इंडियन्सवर 5 गडी राखून विजय
  • रवींद्र जडेजा मैदानात.
  • चेन्नईला २४ चेंडूत ४२ धावांची गरज.
  • रायडू ७१ धावांवर बाद, राहुल चहरने घेतला बळी.
  • १५.२ षटकात चेन्नईच्या २ बाद ११८ धावा, डु प्लेसिस अर्धशतकाजवळ.
  • चेन्नईचे १३.१ षटकात शतक,४१ चेंडूत ६३ धावांची गरज
  • रायडूच्या अर्धशतकी खेळीत ६ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश.
  • रायडूचे अर्धशतक पूर्ण, डु प्लेसिसच्या २ चौकारांसह नाबाद २८ धावा.
  • चेन्नईच्या १० षटकात २ बाद ७० धावा.
  • रायडू आणि फाफ डु प्लेसिसने संघाचा डाव सावरला.
  • चेन्नईच्या ५ षटकात २ बाद २३ धावा.
  • अंबाती रायडू मैदानात.
  • चेन्नईचा दुसरा फलंदाज बाद, पॅटिंसनने मुरली विजयला धाडले माघारी.
  • फाफ डु प्लेसिस आणि मुरली विजय मैदानात.
  • चेन्नईच्या पहिल्या षटकात १ बाद ५ धावा.
  • शेन वॉटसन ४ धावांवर माघारी, बोल्टला मिळाला बळी.
  • वॉटसनकडून चेन्नईचा पहिला चौकार.
  • ट्रेंट बोल्टकडून मुंबईच्या गोलंदाजीची सुरुवात.
  • चेन्न्ईच्या डावाची सुरुवात, मुरली विजय आणि शेन वॉटसन मैदानात.
  • मुंबईचे चेन्नईला १६३ धावांचे आव्हान
  • मुंबईच्या २० षटकात ९ बाद १६२ धावा, बुमराह ५ तर चहर २ धावांवर नाबाद.
  • बोल्ट शून्यावर बाद, दीपक चहरकडून बोल्टचा त्रिफळा उध्वस्त.
  • मुंबईच्या १९ षटकात ८ बाद १५६ धावा. ट्रेंट बोल्ट आणि राहुल चहर मैदानात.
  • लुंगी एनगिडीच्या ४ षटकात ३८ धावांत ३ बळी.
  • जेम्स पॅटिन्सन ११ धावांवर बाद, फाफ डु प्लेसिसचा तिसरा झेल.
  • मुंबईचा डाव गडगडला, एनगिडीचा तिसरा बळी.
  • यष्टीपाठी धोनीने घेतला पोलार्डचा झेल.
  • कायरन पोलार्ड १८ धावांवर माघारी, लुंगी एनगिडीने केले बाद.
  • लुंगी एनगिडीने कृणालला केले बाद.
  • मुंबईला सहावा धक्का, कृणाल पांड्या ३ धावांवर बाद.
  • मुंबईच्या १५ षटकात ५ बाद १२६ धावा.
  • कृणाल पांड्या आणि पोलार्डची जोडी मैदानात.
  • फाफ डु प्लेसिसने घेतला पांड्याचा अप्रतिम झेल.
  • जडेजाचा मुंबईला अजून एक धक्का, हार्दिक पांड्या १४ धावांवर माघारी.
  • अष्टपैलू क्रिकेटपटू कायरन पोलार्ड मैदानात.
  • फिरकीपटू रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर फाफ डु प्लेसिसने घेतला सौरभचा अप्रतिम झेल.
  • मुंबईला तिसरा धक्का, सौरभ तिवारी ३ चौकार आणि एका षटकारासह ४२ धावांवर बाद.
  • पांड्याचे जडेजाला लागापोठ दोन षटकार
  • अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्या मैदानात.
  • वेगवान गोलंदाज दीपक चहरने सॅम करनकरवी सूर्यकुमारला केले झेलबाद.
  • मुंबईचा तिसरा गडी बाद, सूर्यकुमार यादव १७ धावांवर माघारी.
  • मुंबईच्या १० षटकात २ बाद ८६ धावा.
  • सूर्यकुमारच्या २ चौकारांसह १५ तर सौरभच्या २१ धावा.
  • ९ षटकात मुंबईच्या २ बाद ८३ धावा.
  • सौरभ तिवारीच्या बॅटमधून आयपीएलच्या तेराव्या पर्वाचा पहिला षटकार.
  • मुंबईचा सौरभ तिवारी मैदानात.
  • क्विंटन डी कॉक ३३ धावांवर बाद, सॅम करनने धाडले माघारी
  • मुंबईचा दुसरा सलामीवीरही माघारी.
  • मुंबईच्या पहिल्या पाच षटकात १ बाद ४८ धावा.
  • मुंबईचा फलंदाज सूर्यकुमार यादव मैदानात.
  • मुंबईच्या ४.४ षटकात १ बाद ४६ धावा.
  • रोहित शर्मा १२ धावांवर बाद, पीयुष चावलाने धाडले माघारी.
  • दीपक चहरच्या दुसऱ्या षटकात तीन चौकार
  • रोहित आणि डी कॉकची दमदार सलामी.
  • पहिल्या षटकात मुंबईच्या बिनबाद १२ धावा.
  • रोहितच्या चौकाराने आयपीएलच्या तेराव्या पर्वाची सुरुवात.
  • रोहित आणि डी कॉकच्या रुपात मुंबईचे सलामीवीर मैदानात.
  • नाणेफेक जिंकून चेन्नईचा गोलंदाजीचा निर्णय.

मुंबई इंडियन्सची प्लेईंग XI-

रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, कायरन पोलार्ड, कृणाल पांड्या, हार्दिक पांड्या, राहुल चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, सौरभ तिवारी, जेम्स पॅटिंसन.

चेन्नई सुपर किंग्जची प्लेईंग XI-

एमएस धोनी (यष्टीरक्षक/कर्णधार), शेन वॉटसन, अंबाती रायुडू, फाफ डु प्लेसिस, केदार जाधव, रवींद्र जडेजा, पीयूष चावला, दीपक चहर, मुरली विजय, लुंगी एनगिडी, सॅम करन.

Last Updated : Sep 19, 2020, 11:58 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details