चेन्नई - भारत-चीन सीमेवर दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये सोमवारी रात्री झटापट झाली. यामध्ये भारताच्या 20 जवानांना वीरमरण आले. तसेच चीनची देखील मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. चीनचे 40 पेक्षा जास्त सैनिक ठार झाल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी वादग्रस्त ट्विट करणाऱ्या आयपीएल फ्रेंचायझी चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) संघाचे डॉक्टर मधु थोटापिल्लिल निलंबित झाले आहेत.
सीएसकेने ही थोटापिल्लिल यांचे निलंबन केले आहे. फ्रेंचायझीने ट्विटरद्वारे ही माहिती दिली. ''डॉ. मधु थोटापिल्लीनी केलेल्या ट्विटची माहिती चेन्नई सुपर किंग्ज व्यवस्थापनाला नव्हती. त्यांना संघाच्या डॉक्टर पदावरून निलंबित करण्यात आले आहे. चेन्नई सुपर किंग्ज या ट्विटवर खेद व्यक्त करत आहे. जे व्यवस्थापनाच्या ज्ञानाशिवाय केले गेले आणि ते दुर्भावनायुक्त होते'', असे सीएसकेने म्हटले.