लंडन - इंग्लंडचा माजी कर्णधार केव्हिन पीटरसनने भारतीय फलंदाज महेंद्रसिंह धोनीबाबत नुकतीच एक पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर आपीएलमध्ये धोनी कर्णधार असलेल्या चेन्नई सुपर किंग्जने या पोस्टबाबत पीटरसनला सणसणीत उत्तर दिले आहे.
धोनीसंदर्भातील ‘त्या’ पोस्टवर सीएसकेचे पीटरसनला सणसणीत उत्तर - chennai super kings on pietersen news
इंग्लंडकडून फलंदाजी करताना आणि सामन्यादरम्यान धोनीशी बोलत असलेला फोटो पीटरसनने शेअर केला होता. या फोटोच्या कॅप्शनमध्ये पीटरसनने धोनीला त्याच्यासाठी क्षेत्ररक्षण लावण्यास सांगितले होते. एवढेच नव्हे तर, त्याने भारताविरूद्ध धावा करणे किती सोपे आहे, असेही म्हटले होते. यावर चेन्नईने एक फोटो ट्विट केला आहे ज्यामध्ये धोनी पीटरसनला यष्टीचित करताना दिसत आहे.
इंग्लंडकडून फलंदाजी करताना आणि सामन्यादरम्यान धोनीशी बोलत असलेला फोटो पीटरसनने शेअर केला होता. या फोटोच्या कॅप्शनमध्ये पीटरसनने धोनीला त्याच्यासाठी क्षेत्ररक्षण लावण्यास सांगितले होते. एवढेच नव्हे तर, त्याने भारताविरूद्ध धावा करणे किती सोपे आहे, असेही म्हटले होते.
यावर चेन्नईने एक फोटो ट्विट केला आहे ज्यामध्ये धोनी पीटरसनला यष्टीचित करताना दिसत आहे. “बर्याच वेळा क्षेत्ररक्षणाची आवश्यकता नसते”, असे सीएसकेने या ट्विटच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे. पीटरसनला सीएसकेने दिलेले हे सणसणीत उत्तर पाहून धोनीसमर्थक भलतेच खूष झाले आहेत.