दुबई -दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये आज आयपीएलचा १४वा सामना रंगत आहे. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद आमनेसामने आले आहेत. दोन्ही संघांनी आतापर्यंतच्या तीन सामन्यांपैकी दोन सामने गमावले असल्यामुळे हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा असणार आहे. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने मैदानावर पाऊल ठेवताच एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे.
भारताचा दिग्गज माजी कर्णधार धोनी आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक सामने खेळलेला खेळाडू ठरला आहे. धोनीने यापूर्वी आयपीएलमध्ये १९३ सामने खेळले आहेत. त्यामुळे सनरायझर्सविरुद्धचा सामना हा त्याच्या आयपीएल कारकिर्दीचा १९४वा सामना आहे. चेन्नईचा स्टार फलंदाज आणि यावर्षी आयपीएलमधून माघार घेतलेल्या सुरेश रैनाने १९३ सामने खेळले आहेत.