मुंबई- कोरोनाला रोखण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. विविध क्षेत्रातील नामवंत मंडळी सोशल मीडियाच्या माध्यमातून, नागरिकांना घराबाहेर पडू नका, असे आवाहन करत आहेत. अशातच भारताच्या आजी-माजी खेळाडूंनी तर याबाबत एक धम्माल गाणं तयार केलं आहे. या गाण्याचे बोल 'डोन्ट यू वरी, बस ना घरी...' असे आहे. सद्या हे गाणं चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.
डोन्ट यू वरी, बस ना घरी... या गाण्यात श्रेयस अय्यर, धवल कुलकर्णी, वसिम जाफर, साईराज बहुतुले, जेमिमा रॉड्रिक्स अशा प्रसिद्ध आजी-माजी क्रिकेटपटूंचा सहभाग आहे. तर या गाण्याचे लेखन, संकल्पना, संगीत आणि दिग्दर्शन, प्रसिद्ध निर्माता, संगीतकार अभिजीत कवठाळकर आणि डॉ. ज्योत्सना चित्रोडा यांनी केलं आहे.