दुबई - जगातील सर्वात रोमांचक लीग इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) १२ हंगाम यशस्वी झाले आहेत. आता १३वा हंगाम १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत खेळला जाईल. या लीगने अनेक युवा खेळाडू देशाला दिले आहेत. जसप्रीत बुमराह, क्रुणाल पांड्या असे खेळाडू 'स्टार' म्हणून उदयास आले आहेत. मात्र, काही असे खेळाडूही होते, जे एकेकाळी स्टार बनले, परंतू त्यांचे कर्तृत्व सर्वजण विसरले आहेत. जाणून घ्या या आयपीएल खेळाडूंबद्दल -
पॉल वल्थाटी -
२०११मध्ये पॉल वल्थाटीने किंग्ज इलेव्हन पंजाबकडून चांगली कामगिरी बजावली. पण २०१२च्या हंगामानंतर पंजाबने त्याची संघात निवड केली नाही. आपल्या कारकिर्दीत त्याने २३ सामन्यात २३च्या सरासरीने एक शतक आणि अर्धशतकासह ५०५ धावा केल्या.
डग बोलिंगर -
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज डग बोलिंगर २०१० ते २०१२ दरम्यान सीएसके संघाचा भाग होता. आयपीएल कारकिर्दीत बोलिंगरने २३ सामन्यांत ३७ बळी घेतले.