मुंबई - टीम इंडियाचा माजी सलामीवीर आणि भाजपचा विद्यमान खासदार गौतम गंभीर याने कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी आणखी एका मोठ्या मदतीची घोषणा केली आहे. त्याने आपला पुढील दोन वर्षांचा पगार, कोरोनाग्रस्तांसाठी देण्याचे जाहीर केले आहे. गंभीरने याची घोषणा ट्विटरच्या माध्यमातून केली.
याविषयी गंभीर म्हणाला, 'प्रत्येक जण म्हणतो की, देशांने माझ्यासाठी काय केलं. पण रिअल प्रश्न हा आहे की, आपण देशासाठी काय करु शकतो. मी माझी दोन वर्षांची पगार पंतप्रधान केअर निधी देत आहे.'
दरम्यान, याआधी गंभीरने कोरोनाग्रस्तांसाठी आपल्या खासदार निधीतून ५० लाख आणि नंतर एक कोटी रुपये दिले होते.
लोकसभेतील खासदाराला एका महिन्याला दोन लाखाहून अधिक पगार मिळतो. गंभीरने पुढील दोन वर्षांचा पगार कोरोनाग्रस्तांसाठी देण्याचे जाहीर केले आहे.