शिमला - कोरोनाचा धोका टाळण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरू आहे. यामुळे सर्व जण घरीच थांबले आहेत. पण काही लोक या निर्देशाचे पालन न करता घराबाहेर येत आहेत. अशा लोकांवर पोलीस कारवाई करत आहे. अशीच कारवाई भारतीय क्रिकेट संघातील अष्ठपैलू खेळाडू ऋषी धवनवर झाली.
ऋषी धवन लॉकडाऊनच्या काळात आपल्या कारमधून बाहेर पडला होता. तेव्हा पोलिसांनी त्याला अडवले आणि पासची विचारणी केली. नियमानुसार बाहेर पडल्यास वाहन पासची गरज असते, मात्र हा पास धवनकडे नव्हता. त्यामुळे त्याला लॉकडाऊनचा नियम तोडल्याबद्दल ५०० रुपयांचा दंड केला. ऋषीकडे लॉकडाऊनच्या काळात बाहेर पडण्यासारखे कोणताही कारण नव्हते. त्यामुळे हिमाचल पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली. दरम्यान, ऋषि धवनने कोरोना लढ्यात हिमाचल प्रदेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये १ लाख रुपयांची मदत दिली आहे.