महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

महिला क्रिकेटपटू मानसी जोशीला कोरोनाची लागण - मानसी जोशी लेटेस्ट न्यूज

२७ वर्षीय मानसीला कोरोनाची लागण झाल्यानंतर ती क्वारंटाइन झाली आहे. सध्या ती डेहराडून येथे आयसोलेशनमध्ये आहे. इतर खेळाडू १३ ऑक्टोबरला मुंबईला पोहोचले आहे.

cricketer mansi joshi tests covid positive
महिला क्रिकेटपटू मानसी जोशीला कोरोनाची लागण

By

Published : Oct 17, 2020, 3:52 PM IST

नवी दिल्ली -आगामी महिला टी-२० चॅलेंजर स्पर्धेपूर्वी, भारतीय महिला क्रिकेटपटू मानसी जोशी कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे. पुढील महिन्यात ही स्पर्धा पार पडणार आहे. या चाचणीमुळे मानसीला स्पर्धेत सहभागी होता येणार नाही.

२७ वर्षीय मानसीला कोरोनाची लागण झाल्यानंतर ती क्वारंटाइन झाली आहे. सध्या ती डेहराडून येथे आयसोलेशनमध्ये आहे. इतर खेळाडू १३ ऑक्टोबरला मुंबईला पोहोचले आहे. अहवालानुसार २६ वर्षीय वेगवान गोलंदाज मेघना सिंगला मानसीच्या जागी मिताली राजच्या संघात स्थान देण्यात आले आहे.

मानसीने २०१६मध्ये पदार्पण केले होते. तिने ११ एकदिवसीय आणि ८ टी-२० सामन्यात देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. यूएईमध्ये ४ ते ९ नोव्हेंबर दरम्यान आयपीएलच्या प्लेऑफनंतर ही स्पर्धा खेळली जाईल. मुंबईतील सर्व खेळाडू यूएईला जाण्यापूर्वी ९ दिवसांसाठी वेगळे ठेवले जातील.

ABOUT THE AUTHOR

...view details