कोलकाता -यंदाच्या रणजी करंडक स्पर्धेच्या उपविजेत्या बंगाल संघाला एका आठवड्यात बीसीसीआयकडून एक कोटीची बक्षीस रक्कम मिळणार होती. मात्र, याप्रकरणाबाबत विलंब झाल्यामुळे बंगाल संघाचा माजी कर्णधार आणि भारतीय फलंदाज मनोज तिवारीने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
मनोज तिवारीने गुरुवारी संघातील खेळाडूंशी झालेल्या बैठकीत याबाबत माहिती मागितली. या बैठकीला संघाचे प्रशिक्षक अरुण लाल आणि इतर समर्थक कर्मचारी देखील उपस्थित होते. संघाचे क्रिकेट ऑपरेशन मॅनेजर जयदीप मुखर्जी यांना मनोजने प्रश्न विचारले.
सीएबीचे अध्यक्ष अभिषेक दालमिया यांना यासंदर्भात विचारले असता त्यांनी सांगितले, ''संघ या प्रकरणात काम करत आहे आणि प्रक्रिया पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. अधिकारी त्यासाठी अधिक काम करत आहेत. काही माहिती आणि अंतर्गत ऑडिट पाठवले जाईल. "
ते पुढे म्हणाले, ''एक किंवा दोन दिवसांत ही माहिती बीसीसीआयकडे पाठवली जाईल, अशी अपेक्षा आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खेळाडू, सहाय्यक कर्मचारी आणि सामनाधिकारी यांचे बाकीचे मानधन देणे हे आमचे प्राधान्य आहे. कारण हे त्यांचे मुख्य उत्पन्न आहे. मला विश्वास आहे की लवकरात लवकर या प्रश्नाचे निराकरण होईल."
यंदाच्या रणजी मोसमातील विजेत्या सौराष्ट्रला बुधवारी त्यांची दोन कोटी रुपयांची बक्षीस रक्कम मिळाली आहे.