महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

मनीष पांडेची नवी इनिंग.. 'या' दाक्षिणात्य अभिनेत्रीसोबत अडकला लग्नाच्या बेडीत - मनीष पांडे लेटेस्ट न्यूज

काल तमिळनाडूविरूद्ध झालेल्या सामन्यानंतर मुलाखतीमध्ये मनीषने लग्नाबद्दल सांगितले. अंतिम सामन्यात कर्नाटकने एका धावेने तामिळनाडूचा पराभव केला. या सामन्यात मनीषने ६० धावांची खेळी केली.

cricketer manish pandey weds actress ashrita shetty
कर्नाटकला दोन विजेतेपदं मिळवून देणाऱ्या मनीष पांडेची 'नवी' इनिंग सुरू

By

Published : Dec 2, 2019, 4:16 PM IST

मुंबई -टीम इंडियाचा युवा फलंदाज मनीष पांडे आज मुंबईत लग्नाच्या बेडीत अडकला. दाक्षिणात्य अभिनेत्री अश्रिता शेट्टीसह मनीषने लग्नगाठ बांधली. काल रविवारी पार पडलेल्या सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत मनीषच्या नेतृत्वाखाली कर्नाटकने विजेतेपद मिळवले आहे.

हेही वाचा -थरारक!..शेवटच्या चेंडूपर्यंत रंगतदार झालेल्या सामन्यात कर्नाटक विजयी

काल तमिळनाडूविरूद्ध झालेल्या सामन्यानंतर मुलाखतीमध्ये मनीषने लग्नाबद्दल सांगितले. अंतिम सामन्यात कर्नाटकने एका धावेने तामिळनाडूचा पराभव केला. या सामन्यात मनीषने ६० धावांची खेळी केली. ६ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विंडीजविरूद्धच्या मालिकेसाठी मनीषला टीम इंडियात स्थान मिळाले आहे. सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेच्या विजेतेपदासोबतच कर्नाटकने तमिळनाडूचाच पराभव करत विजय हजारे ट्रॉफीचेही विजेतेपद पटकावले होते.

कोण आहे अश्रिता शेट्टी ?

अश्रिता शेट्टी ही दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीमधील अभिनेत्री आहे. तिने इंद्रजीत, उद्यम एनएच ४ आणि ओरू कन्नियुम मुनू कलावनीगलूम या चित्रपटात अभिनय केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details