मुंबई - भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू जयंत यादवने प्रेयसी दिशा चावलाशी साखरपुडा केला आहे. या समारंभाला टीम इंडियाचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने उपस्थिती नोंदवली होती. चहलने सोशल मीडियावरूनही जयंतला साखरपुड्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
क्रिकेटपटू जयंत यादवचा झाला साखरपुडा...मुंबई इंडियन्सनं केलं खास ट्विट - जयंत यादव आणि दिशा चावला साखरपुडा न्यूज
आयपीएलमध्ये जयंत मुंबई इंडियन्सकडून खेळतो. मुंबई इंडियन्सने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून जयंत आणि दिशाला शुभेच्छा दिल्या आहेत. 'अभिनंदन आणि या अतुट नात्यासाठी शुभेच्छा', असे मुंबई इंडियन्सने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

२०१६ मध्ये जयंतने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाकडून पदार्पण केले होते. या मालिकेतील चौथ्या सामन्यात त्याने शतक झळकावले होते. ९ व्या क्रमांकावर येऊन शतक ठोकणारा जयंत हा पहिला भारतीय क्रिकेटपटू आहे. या विक्रमामध्ये त्याने फारूख इंजीनियर यांना पछाडले. फारूख इंजीनियर यांनी ९ व्या क्रमांकावर फलंदाजी करताना ९० धावा केल्या होत्या.