महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

'बाप'माणूस हार्दिक पांड्याचा 'तो' फोटो सोशल मीडियावर होतोय व्हायरल! - hardik pandya latest photo

पांड्याने शनिवारी इन्स्टाग्रामवर हा फोटो शेअर केला. मुलाला हातात घेतलेल्या हार्दिकचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. ''देवाचा आशिर्वाद'', असे हार्दिकने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले असून त्याने नताशाला टॅग केले आहे.

cricketer hardik pandya shared adorable photo with his son
'बाप'माणूस हार्दिक पांड्याचा 'तो' फोटो सोशल मीडियावर होतोय व्हायरल!

By

Published : Aug 1, 2020, 2:59 PM IST

हैदराबाद -भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्या आणि त्याची गर्लफ्रेंड नताशा स्टँकोविच नुकतेच पालक झाले आहेत. नताशाने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. या आनंदाच्या बातमीनंतर आता हार्दिकने आपल्या मुलासोबतचा एक फोटो शेअर केला आहे.

पांड्याने शनिवारी इन्स्टाग्रामवर हा फोटो शेअर केला. मुलाला हातात घेतलेल्या हार्दिकचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. ''देवाचा आशिर्वाद'', असे हार्दिकने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले असून त्याने नताशाला टॅग केले आहे.

हार्दिकने लॉकडाऊन काळात सोशल मीडियावर चाहत्यांसमवेत नताशाच्या गरोदरपणाची माहिती देत काही फोटो देखील शेअर केले होते. त्या फोटोंपैकी एका फोटोमध्ये हार्दिकने घरातच एक धार्मिक विधी केल्याचा फोटो पोस्ट केला होता. तेव्हा इतरांप्रमाणे हार्दिकने देखील लॉकडाऊन लग्न उरकले की काय? अशी चर्चा चाहत्यांमध्ये रंगली होती.

हार्दिक आणि अभिनेत्री नताशाने जानेवारीत महिन्यात साखरपूडा केला होता. त्यानंतर ते दोघे सोबतच राहत होते. काही दिवसांपूर्वीच दोघांचे मॅटर्निटी शूटचे फोटो हार्दिकने शेअर केले होते. हार्दिक बाप झाल्याची बातमी समजताच त्याचे क्रिकेटपटू मित्र आणि चाहत्यांनी त्यांचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली.

ABOUT THE AUTHOR

...view details