महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

धावांची बरसात करणारा 'युनिव्हर्स बॉस' आता टिकटॉकवर बरसणार! - Gayle Video on tiktok news

फार कमी वेळात व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म म्हणून टिकटॉक अ‌ॅप लोकप्रिय झाले. गेलने आपला पहिला व्हिडिओ टिकटॉकवर पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये तो शेवटी समोर येतो. गेलने पोस्ट केलेल्या पहिल्या व्हिडिओमुळे आगामी काळात तो खूप मस्ती करणार असल्याचे कळत आहे.

Cricketer Chris Gayle Joins TikTok, Posts First Video
धावांची बरसात करणारा युनिव्हर्स बॉस आता टिकटॉकवर बरसणार!

By

Published : Jan 4, 2020, 11:47 AM IST

नवी दिल्ली - वेस्ट इंडिज क्रिकेटला नव्या उंचीवर नेऊन ठेवणारा स्फोटक फलंदाज ख्रिस गेल आता आपल्याला रोज नवीन अंदाजात पाहायला मिळणार आहे. लोकप्रिय व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म असलेल्या टिकटॉकमध्ये गेलने पदार्पण केले आहे.

हेही वाचा -हिटमॅनच्या गैरहजेरीचा विराट घेणार फायदा, बळकावणार पहिले स्थान

फार कमी वेळात व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म म्हणून टिकटॉक अ‌ॅप लोकप्रिय झाले. गेलने आपला पहिला व्हिडिओ टिकटॉकवर पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये तो शेवटी समोर येतो. गेलने पोस्ट केलेल्या पहिल्या व्हिडिओमुळे आगामी काळात तो खूप मस्ती करणार असल्याचे कळत आहे.

गेलच्या या व्हिडिओला २३४ हजार लाईक्स मिळाले असून त्याचे त्याचे ५७९ हजार फॉलोअर्स झाले आहेत. गेलने २०१९ मध्ये दक्षिण आफ्रिकेतील मझांसी सुपर लीग (Mzansi Super League) मधून माघार घेतली. तसेच त्याने ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीग स्पर्धाही खेळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. गेल विश्रांती घेऊन २०२० सालची रणनीती आखणार आहे.

काही दिवसांपूर्वी गेलने पत्रकार परिषद घेऊन, मी जेव्हा चांगला खेळ करतो. तेव्हा सन्मान मिळतो. पण ज्यावेळी मी अपयशी ठरतो. तेव्हा मात्र मी सर्वात खराब खेळाडू ठरतो. मी हे केवळ एका संघाबाबत सांगत नाही. मी विविध टी-२० लीग क्रिकेट स्पर्धेत अनेक वर्षे खेळलो आहे, त्यात मी जे अनुभवले ते सांगत असल्याचे म्हणाला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details