लंडन -विश्वकरंडक विजेत्या इंग्लंड क्रिकेट संघाचा खेळाडू बेन स्टोक्स आणि विश्वविजेती धावपटू दिना अॅशर-स्मिथ यांना क्रीडा पत्रकार संघटनेचा (एसजेए) पुरस्कार मिळाला आहे. स्टोक्स आणि अॅशर -स्मिथ यांना अनुक्रमे स्पोर्ट्समन आणि स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हेही वाचा -लाडक्या लेकासोबत सानिया मिर्झाचा क्युट अंदाज, पाहा फोटो
यावर्षी दोहा येथे झालेल्या जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत तीन सुवर्णपदके जिंकून इतिहास रचणार्या अॅशर-स्मिथला सलग दुसऱ्यांदा हा पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्काराची सुरूवात १९४९ मध्ये झाली होती. आतापर्यंतचा हा मिळाला ब्रिटनच्या सर्वात जुना क्रीडा पुरस्कार आहे.
या समारंभात इंग्लंडच्या पुरुष क्रिकेट संघाला 'टीम ऑफ द इयर' पुरस्कार मिळाला. तर, विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य असलेला वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला इंटरनॅशनल न्यूकमरचा पुरस्कार मिळाला आहे.