महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

शेवटच्या 9 चेंडूत 3 टर्निंग पॉईंन्ट, इंग्लंड 'लकी' तर न्यूझीलंड ठरला 'अनलकी' - world cup 2019

आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेचा अंतिम सामना इंग्लंड विरुध्द न्यूझीलंडचा सामना बरोबरीत सुटला. तेव्हा सुपर ओव्हरमध्ये खेळवण्यात आली. मात्र, या सुपर ओव्हरमध्येही सामना बरोबरीत सुटला. तेव्हा चौकारांच्या निकषानुसार इंग्लंड संघाला विजयी घोषीत करण्यात आले. दरम्यान या सामन्यात न्यूझीलंडचा संघ 'अनलकी' ठरला. शेवटच्या 9 चेंडूत सामन्याचे निकाल पालटणारे 3 'टर्निंग पॉईंन्ट' आले.

शेवटच्या ९ चेंडूत ३ टर्निंग पॉईंन्ट, इंग्लंड 'लकी' तर न्यूझीलंड ठरला 'अनलकी'

By

Published : Jul 15, 2019, 10:16 PM IST

Updated : Jul 15, 2019, 11:52 PM IST

लंडन- आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेतील इंग्लंड विरुध्द न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामना बरोबरीत सुटला. तेव्हा सुपर ओव्हरमध्ये खेळवण्यात आली. मात्र, या सुपर ओव्हरमध्येही सामना बरोबरीत सुटला. तेव्हा चौकारांच्या निकषानुसार इंग्लंड संघाला विजयी घोषीत करण्यात आले. दरम्यान या सामन्यात न्यूझीलंडचा संघ 'अनलकी' ठरला. शेवटच्या 9 चेंडूत सामन्याचे निकाल पालटणारे 'टर्निंग पॉईंन्ट' आले. हे पॉईंन्ट इंग्लंडच्या बाजूने झुकले आणि इंग्लंड विजयी ठरला. वाचा काय आहेत ते क्षण...

पहिला टर्निंग पॉईन्ट -
इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात फलंदाजी करत असताना, 49 वे षटक जिम्मी निशमने टाकले. या षटकात इंग्लंडला विजयासाठी 12 चेंडूत 24 धावांची गरज होती. पहिल्या चेंडूवर लियाम प्लॅकेंटने एक धाव घेतली. दुसऱ्या चेंडूवर स्टोक्सने एक धाव घेतली. तिसऱ्या चेंडूवर प्लॅकेंट बोल्टकडे झेल देत बाद झाला. चौथ्या चेंडूवर बेन स्टोक्सने मीड विकेटला जोरदार फटका लगावला. त्या ठिकाणी ट्रेट बोल्ट क्षेत्ररक्षण करत होता. बोल्टने सीमारेषेच्या एक इंच जवळ स्टोक्सचा झेल घेतला. मात्र, त्याला मागे असलेल्या सीमारेषेचा अंदाज आला नाही. तो थोडा मागे सरकला आणि त्याचा बुट सीमारेषेला 'टच' झाला.

दुसरा टर्निंग पॉईन्ट -
इंग्लंड संघाला विजयासाठी शेवटच्या षटकात 15 धावांची गरज होती. समोर गोलंदाज होता ट्रेट बोल्ट, मैदानात नांगर टाकून थांबलेला स्टोक्स आणि नुकताच मैदानात आलेला आदिल रशिद फलंदाजी करत होते. या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर स्टोक्सने षटकार लगावला. याच षटकाच्या चौथ्या चेंडूवर स्टोक्सने मीड विकेटला जोरदार फटका लगावला आणि राशिदला दोन धावांसाठी कॉल दिला. तेव्हा सीमारेषेवर क्षेत्ररक्षणासाठी तैनात असलेल्या गुप्टीलने काही क्षणात चेंडू उचलून स्टोक्सला बाद करण्यासाठी थ्रो केला. मात्र, हा थ्रो स्टोक्सच्या बॅटला लागून थेट सीमारेषेपार गेला. तेव्हा पंचानी पळालेल्या दोन धावा आणि चौकार असे मिळून इंग्लंडला सहा धावा बहाल केल्या.

तिसरा टर्निंग पॉईन्ट -
दुसऱ्या डावातीलच 50 व्या षटकात पाचव्या चेंडूवर स्टोक्सने जोरदार फटका मारला आणि दोन धावासाठी तो पळाला. दुसरी धावा घेताना दोन्ही फलंदाज खेळपट्टीच्या मधोमध होते. तेव्हा गोलंदाज ट्रेट बोल्टच्या हातात थ्रो आला. त्याने त्या थ्रोने नॉन स्ट्राईकच्या यष्ट्या उडवल्या. यात नॉन स्ट्राईकवर असलेल्या आदिल रशिद बाद झाला. जर बोल्टने स्टोक्स पळत असलेल्या बाजुने थ्रो करत यष्ट्या उडवल्या असता, तर वोक्स बाद झाला असता.

दरम्यान, रविरारचा दिवस यजमान इंग्लंडसाठी 'लकी' तर न्यूझीलंडसाठी 'अनलकी'चं ठरला. या सामन्यात दोन पंचांचे निर्णय न्यूझीलंडच्या विरोधात गेले. रॉस टेलर नाबाद असताना त्याला पंचांनी बाद ठरवले. त्याचबरोबर जेसन रॉय पायचीत असतानाही त्याला नाबाद ठरवले गेले.

Last Updated : Jul 15, 2019, 11:52 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details