लंडन- यजमान इंग्लंडने चित्तथरारक सामन्यात सुपर ओव्हरच्या नियमानुसार प्रथमच आयसीसी विश्वकरंडकावर आपले नाव कोरले. विश्वविजेता ठरुन देखील इंग्लंड संघाची जेवढी चर्चा झाली नाही, तेवढी न्यूझीलंडच्या संघाचा पराभव होऊन झाली. तसेच या सामन्यात न्यूझीलंडच्या ट्रेट बोल्टच्या खिलाडवृत्तीचे जगभरात कौतूक होत आहे.
बोल्ट, सलाम तुझ्या खिलाडूवृत्तीला...! ट्रेटच्या 'त्या' निर्णयाचे जगभरातून कौतूक
४९ व्या षटकातील चौथ्या चेंडूवर इंग्लंडचा फलंदाज वोक्सने निशामच्या गोलंदाजीवर जोरदार फटका लगावला. हा चेंडू सीमारेषेजवळ थांबलेल्या ट्रेट बोल्टने उडी घेत टिपला. मात्र, हवेत चेंडू झेलताना त्याचा पाय सीमारेषेला स्पर्श झाला. तेव्हा मैदानातील पंचांनी इशारा देण्यापूर्वीच बोल्टने षटकार असल्याचा इशारा पंचाला केला. सामन्यात हा महत्त्वाचा क्षण होता. मात्र, खिलाडूवृत्ती दाखवत बोल्टने हा षटकार असल्याचे पंचाना सांगितले.
अंतिम सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडसमोर ५० षटकात २४१ धावा करुन २४२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. तेव्हा धावांचा पाठलाग करताना ४९ व्या षटकातील चौथ्या चेंडूवर इंग्लंडचा फलंदाज वोक्सने निशामच्या गोलंदाजीवर जोरदार फटका लगावला. हा चेंडू सीमारेषाजवळ थांबलेल्या ट्रेट बोल्टने उडी घेत टिपला. मात्र, हवेत चेंडू झेलताना त्याच्या पायाचा सीमारेषेला स्पर्श झाला. तेव्हा मैदानातील पंचानी इशारा देण्यापूर्वीच बोल्टने षटकार असल्याचा इशारा पंचाला केला. सामन्यात हा महत्त्वाचा क्षण होता. मात्र, खिलाडूवृत्ती दाखवत बोल्टने हा षटकार असल्याचे पंचाना सांगितले. त्याच्या या खिलाडूवृत्तीचे कौतूक जगभरातून होत आहे.
दरम्यान, न्यूझीलंडने २४१ धावा केल्या होत्या. तेव्हा इंग्लंड संघानेदेखील २४१ धावाच केल्या. त्यामुळे सामन्यात सुपर ओव्हर खेळवण्यात आली. मात्र, सुपर ओव्हरमध्येही सामना अनिर्णित राहिला. यामुळे सर्वाधिक चौकारांच्या निकषावर इंग्लंडला विश्वविजेता घोषित करण्यात आले.