नवी दिल्ली - सध्या लोकांना ज्या परिस्थितीशी सामोरे जावे लागत आहे, त्या तुलनेत क्रिकेट ही अगदी लहान गोष्ट आहे, असे मत फिरकीपटू हरभजन सिंगने मांडले आहे. देशभरात कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सध्या 21 दिवसांचा लॉकडाउन लागू करण्यात आला आहे.
'देशासमोर क्रिकेट ही एक छोटीशी गोष्ट' - कोरोनायुद्धाच हरभजन सिंगचे क्रिकेटविषयी मत न्यूज
'खरे सांगायचे तर, गेल्या 15 दिवसांत क्रिकेट माझ्या मनात यापूर्वी आले नाही. देशासमोर क्रिकेट ही एक छोटीशी गोष्ट आहे. जर मी क्रिकेट आणि आयपीएलबद्दल विचार केला तर मी स्वार्थी होईल. आमचे प्राधान्य आहे की सर्वांनी निरोगी रहावे. आम्ही सुरक्षित आणि निरोगी राहिलो तरच भारत तंदुरुस्त होईल’, असे हरभजनने म्हटले आहे
'खरे सांगायचे तर, गेल्या 15 दिवसांत क्रिकेट माझ्या मनात यापूर्वी आले नाही. देशासमोर क्रिकेट ही एक छोटीशी गोष्ट आहे. जर मी क्रिकेट आणि आयपीएलबद्दल विचार केला तर मी स्वार्थी होईल. आमचे प्राधान्य आहे, की सर्वांनी निरोगी रहावे. आम्ही सुरक्षित आणि निरोगी राहिलो तरच भारत तंदुरुस्त होईल’, असे त्याने म्हटले आहे.
कोरोना व्हायरसमुळे देशातील सर्व खेळांचे आयोजन पुढे ढकलले गेले आहे. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)च्या 13व्या आवृत्तीलाही 15 एप्रिलपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे.