महाराष्ट्र

maharashtra

ऑस्ट्रेलियाचा दक्षिण अफ्रिका दौरा रद्द, जाणून घ्या कारण

By

Published : Feb 2, 2021, 4:38 PM IST

फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस ऑस्ट्रेलियाचा संघ टिम पेनच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार होता. उभय संघात ३ सामन्याची कसोटी मालिका खेळवण्यात येणार होती. पण हा दौरा क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कोरोनामुळे स्थगित केला आहे.

cricket australia postpone south africa tour due to covid-19
ऑस्ट्रेलियाचा दक्षिण अफ्रिका दौरा रद्द, जाणून घ्या कारण

मेलबर्न - कोरोना संसर्गामुळे ऑस्ट्रेलिया संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा रद्द झाला आहे. याची स्पष्टोक्ती क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एका ट्विटच्या माध्यमातून केली.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्यांच्या अधिकृत स्टेटमेंटमध्ये सांगितले की, 'आज आम्ही दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाला कळवले आहे की, कोरोनाच्या संसर्गामुळे आम्ही हा दौरा स्थगित करत आहोत. दौरा स्थगित करण्याशिवाय आमच्याकडे कोणताच पर्याय नाही.'

दरम्यान, फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस ऑस्ट्रेलियाचा संघ टिम पेनच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार होता. उभय संघात ३ सामन्याची कसोटी मालिका खेळवण्यात येणार होती. पण हा दौरा क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्थगित केला आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निक हॉकले यांनी सांगितले की, 'दक्षिण आफ्रिकेचा दौरा याकाळात करणे जोखमिचे ठरेल. दौरा स्थिगित करण्याचा निर्णय घेणे कठिण असून आम्ही खूप निराश आहोत.'

दक्षिण आफ्रिकेत कोरोनाची दुसरी लाट आली आहे. यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. या कारणाने क्रिकेट ऑस्ट्रेलियाने हा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा -केकेआरचा स्टार खेळाडू नरेनच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन

हेही वाचा -गुड न्यूज : टीम इंडियाचा स्टार फलंदाज दुखापतीतून सावरला, इंग्लंडविरुद्ध खेळणार

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details