मेलबर्न- ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने इंग्लंड येथे होणाऱ्या विश्वकंरडक स्पर्धेसाठी १५ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. १ वर्षांची बंदी संपल्यानंतर स्टीव्हन स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर दोघांनाही संघात स्थान देण्यात आले आहे.
चेंडू छेडछाड प्रकरणानंत स्मिथ-वॉर्नर जोडीवर १ वर्षाची बंदी घालण्यात आली होती. मार्च महिन्यात ही बंदी संपली होती. ऑस्ट्रेलियाच्या व्यवस्थापनाने दोन्ही खेळाडूंचे महत्व ओळखताना फॉर्मात असलेल्या पीटर हॅन्डसकोम्ब आणि जोश हेजलवूड यांना संघाबाहेर केले आहे. स्टीव्ह स्मिथ संघात परतला असला तरीही अॅरोन फिंचला कर्णधारपदी कायम ठेवण्यात आले आहे.
इंग्लंड येथे होणारी विश्वकरंडक स्पर्धा सुरू होण्यासाठी थोडाच अवधी शिल्लक आहे. आयपीएल स्पर्धा सुरू असतानाही सर्वांच्या नजरा विश्वकंरडकाच्या संघनिवडीकडे लागल्या आहेत. भारताला भारतात आणि पाकिस्तानला हरवल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या संघाला जेतेपदाचा दावेदार मानले जात आहे. विश्वकरंडकात ऑस्ट्रेलियाचा पहिला सामना अफगाणिस्तान विरुद्ध १ जून रोजी होणार आहे.
विश्वकरंडकासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ
अॅरोन फिंच (कर्णधार), जेसन बेहरनडॉर्फ, अॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), नथन कुल्टर-नाइल, पॅट कमिन्स, उस्मान ख्वाजा, नथन लायन, शॉन मार्श , ग्लेन मॅक्सवेल, झाय रिचर्डसन, स्टीव स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टोइनिस, डेव्हिड वार्नर आणि अॅडम झॅम्पा.