नवी दिल्ली - कॅरेबियन प्रीमियर लीगचा यंदाचा हंगाम त्रिनिदाद आणि टोबॅगो येथे 20 सप्टेंबर ते 18 ऑगस्ट दरम्यान खेळवला जाणार आहे. शुक्रवारी हा निर्णय घेण्यात आला. कोरोना 'ब्रेक'नंतर सुरू होणारी ही पहिली टी-20 लीग असेल.
"सर्व संघ आणि अधिकाऱ्यांना हॉटेलमध्ये ठेवण्यात येईल. देशात येण्याच्या पहिल्या दोन आठवड्यांपर्यंत सर्वांना क्वारंटाईन-प्रोटोकॉल पाळावा लागेल. परदेशातून त्रिनिदादमध्ये येणाऱ्या सर्वांची कोरोना चाचणी करण्यात येईल'', असे सीपीएलने सांगितले. ही लीग रिकाम्या स्टेडियममध्ये खेळवण्यात येईल.