नवी दिल्ली -बांगलादेशच्या एकदिवसीय क्रिकेट संघाचा कर्णधार तमीम इक्बाल कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे आर्थिक फटका बसलेल्या ९१ खेळाडूंना मदत करण्यासाठी पुढे आला आहे. डावखुरा फलंदाज तमीम फुटबॉलपटू, क्रिकेटपटू, कबड्डीपटू, वुशु, हॉकीपटू, सायकलपटू, जलतरणपटू आणि जिम्नॅस्ट तसेच प्रशिक्षकांना पाठिंबा देणार आहे.
बांगलादेशचा कर्णधार करणार ९१ खेळाडूंची मदत - bangladesh cricketer tamim iqbal latest news
डावखुरा फलंदाज तमीम फुटबॉलपटू, क्रिकेटपटू, कबड्डीपटू, वुशु, हॉकीपटू, सायकलपटू, जलतरणपटू आणि जिम्नॅस्ट तसेच प्रशिक्षकांना पाठिंबा देणार आहे.
बांगलादेशचा कर्णधार करणार 91 खेळाडूंची मदत
ज्या खेळाडूंनी आपल्या मानधनाची रक्कम पंतप्रधान निधीत दिली त्यांच्या देणग्यांमध्ये तमीमने समन्वय साधला होता. बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनने कोरोनाविरूद्ध सुरू असलेल्या लढाईत हातभार लावण्यासाठी आपल्या आवडत्या बॅटचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे.
बॅटचा लिलाव करणारा शाकिब हा दुसरा बांगलादेशी क्रिकेटपटू आहे. त्याच्या आधी अनुभवी यष्टिरक्षक फलंदाज मुशफिकुर रहीमनेही कोरोना पीडितांच्या मदतीसाठी त्याच्या बॅटचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला होता.