कोलंबो - कोरोना विषाणूविरुद्ध लढा देण्यासाठी श्रीलंका क्रिकेट बोर्डाने मोठे पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून त्यांनी आपल्या देशातील सर्व स्थानिक स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
शुक्रवारी श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटभया राजपक्षे यांनी २३ मार्चपर्यंत कर्फ्यू जाहीर केला. यानंतर श्रीलंका क्रिकेट बोर्डाने ट्विट करत सांगितलं की, 'देशातील सद्य परिस्थिती पाहता, श्रीलंका क्रिकेट बोर्डाने सर्व स्थानिक स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.'
दरम्यान, याआधी १२ मार्चपासून इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्याची कसोटी मालिका आधीच रद्द करण्यात आली आहे. तर श्रीलंकेत २३ मार्चपर्यंत कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे.