लंडन- कोरोनाग्रस्ताच्या मदतीसाठी इंग्लंडचा क्रिकेटपटू जोस बटलरने २०१९ च्या विश्वकरंडकामधील जर्सीचा लिलाव करण्याचा निर्णय घेत, ती जर्सी लिलावासाठी ठेवली होती. त्या जर्सीवर मागील सहा दिवस बोली लावली जात होती. त्यानंतर त्याची विक्री करण्यात आली.
बटलरने काही दिवसांपूर्वी कोरोनाग्रस्तासाठी निधी गोळा करण्याचा निर्णय घेतला होता. यात त्याने २०१९ च्या विश्व करंडकाच्या अंतिम सामन्यामध्ये घातलेली जर्सीचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला होता. या जर्सीच्या लिलावातून मिळणारे पैसे त्याने कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी देणार असल्याचे जाहीर केले होते. बटलरच्या जर्सीला ८० हजार डॉलर इतकी बोली मिळाली. भारतीय चलनात सांगायचे बटलरच्या जवळपास ६० लाख रुपये मिळाले आहेत.
लिलावामध्ये चांगली बोली मिळाल्यानंतर, माझ्यासाठी ही एक खास जर्सी आहे. पण सध्याच्या परिस्थितीत त्याचा उपयोग होऊ शकतो. हे माझ्यासाठी आनंददायी आहे, असे सांगितले. दरम्यान, बटलरच्या या निर्णयावर अनेक क्रिकेटपटूंनी सोशल मीडियावरून त्याचे कौतुक केले आहे.