नवी दिल्ली - क्रिकेटला काहीजण धर्मासमान मानतात. क्रिकेटपटूंना तर एखाद्या देवाप्रमाणे पुजले जाते. एका क्रिकेट चाहत्याने तर तब्बल ९०० किलोमीटरचे अंतर कापून सामना पाहिला असल्याचे तुम्ही वाचले असाल. पण क्रिकेटसाठी स्वतःच्या लग्नात वेळ काढला असल्याचे नक्कीच ऐकले नसाल. होय, असे घडलयं...
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) बुधवारी आपल्या अधिकृत ट्विवर अकाऊंवर एक फोटो ट्विट केला आहे. त्यात एका पट्ट्याने चक्क आपल्या लग्नामध्ये वेळ काढून टी-२० सामना पाहिल्याचे दिसत आहे.
मूळचा पाकिस्तानचा पण सद्य स्थितीत अमेरिकेत स्थायिक असलेला हसन तस्लीम याचा लग्न सोहळा पार पडला. या लग्नसोहळ्यात त्याने पाक-ऑस्ट्रेलिया संघातील टी-२० सामना पाहिला.