नवी दिल्ली - भारत आणि पाकिस्तान यांच्यात इंग्लंडमध्ये विश्वचषकात आमना-सामना होणार आहे. पुलवामा हल्ल्यानंतर या सामन्यांवर आजी-माजी खेळाडूंच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. या वादात बॉलीवूड अभिनेता परेश रावल यांनी त्यांचे परखड मत व्यक्त केले आहे.
नरकात जाऊ दे २ गुण अन् आयसीसीची कारवाई, पण पाकशी क्रिकेटचा सामना नकोच - परेश रावल - paresh rawal
परेश रावल टि्वर करत म्हणाले की, 'भारताने विश्वचषकात पाकिस्तान विरुद्ध सामना खेळू नये. आईसीसीची कारवाई आणि त्या सामन्यात मिळाणारे २ गुण नरकात जाऊ द्या देश आधी येतो आणि त्यानंतर क्रिकेट येतो.'

परेश रावल
परेश रावल टि्वर करत म्हणाले की, 'भारताने विश्वचषकात पाकिस्तान विरुद्ध सामना खेळू नये. आईसीसीची कारवाई आणि त्या सामन्यात मिळाणारे २ गुण नरकात जाऊ द्या देश आधी येतो आणि त्यानंतर क्रिकेट येतो.'
भारत-आणि पाकिस्तान यांच्यात १६ जून रोजी इंग्लंडमध्ये सामना होणारा आहे. पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानशी संबंध तोडण्याच्या संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. दोन्ही संघात सामना होणार की नाही हे येणारा काळच ठरवेल.