महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

दक्षिण आफ्रिकेचा संघ कोलकात्यात दाखल...पाहा व्हिडिओ - india vs south africa update news

मुंबई आणि दिल्लीतील कोरोनाच्या फैलावामुळे कोलकाता आणि दुबईमार्गे आफ्रिकेला पाठवले जाणार आहे. कोलकातामध्ये अद्याप कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. यामुळे आफ्रिका संघाच्या आरोग्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोलकाता सुरक्षित ठिकाण आहे.

Coronavirus: South Africa Team Reach Kolkata, To Leave For Home On Tuesday
दक्षिण आफ्रिकेचा संघ कोलकात्यात दाखल

By

Published : Mar 17, 2020, 9:48 AM IST

कोलकाता -कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिका, पहिल्या सामन्यानंतर रद्द करण्यात आली. यामुळे आफ्रिकेचा संघ आता मायदेशी परतणार आहे. परतीच्या वाटेवर निघालेला आफ्रिकेचा संघ कोलकात्यात दाखल झाला आहे.

आफ्रिकेचा संघ कोलकात्यात दाखल

हेही वाचा -कोरोनासंदर्भात रोहित शर्माचा व्हिडिओ व्हायरल

मुंबई आणि दिल्लीतील कोरोनाच्या फैलावामुळे कोलकाता आणि दुबईमार्गे आफ्रिकेला पाठवले जाणार आहे. कोलकातामध्ये अद्याप कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. यामुळे आफ्रिका संघाच्या आरोग्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोलकाता सुरक्षित ठिकाण आहे. यामुळे आफ्रिकेचा संघ या ठिकाणाहून आफ्रिकेला प्रयाण करेल.

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील धर्मशाळा येथील पहिला सामना पावसामुळे एकही चेंडू न टाकता रद्द करण्यात आला. यानंतर दुसरा सामना खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ लखनऊमध्ये दाखल झाला होता. तेव्हा कोरोनाच्या धोक्यामुळे उर्वरित मालिका रद्द करण्यात आल्याची घोषणा, बीसीसीआयने केली.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details