महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

कोरोनामुळे दक्षिण आफ्रिकेचा श्रीलंका दौरा स्थगित - दक्षिण आफ्रिकेचा श्रीलंका दौरा स्थगित न्यूज

आफ्रिका क्रिकेट बोर्ड (सीएसए) आणि श्रीलंका क्रिकेट बोर्डाने (एसएलसी) हा दौरा तहकूब करण्याचा निर्णय घेतला आहे. सीएएने सोमवारी निवेदन प्रसिद्ध करून यासंदर्भात माहिती दिली आहे.

coronavirus south africa postpone sri lanka tour
कोरोनामुळे दक्षिण आफ्रिकेचा श्रीलंका दौरा स्थगित

By

Published : Apr 20, 2020, 6:56 PM IST

जोहान्सबर्ग - कोरोनामुळे दक्षिण आफ्रिकेने जूनमध्ये सुरू होणारा श्रीलंका दौरा पुढे ढकलला आहे. या दौर्‍यावर दोन्ही संघांना तीन एकदिवसीय मालिका आणि टी-20 सामन्यांची मालिका खेळायची होती.

आफ्रिका क्रिकेट बोर्ड (सीएसए) आणि श्रीलंका क्रिकेट बोर्डाने (एसएलसी) हा दौरा तहकूब करण्याचा निर्णय घेतला आहे. सीएएने सोमवारी निवेदन प्रसिद्ध करून यासंदर्भात माहिती दिली.

सीएसएचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक्स फॉलल म्हणाले, की हे दुर्दैव आहे की आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला आहे. परिस्थिती योग्य झाल्यावर आम्ही हा दौरा आयोजित करण्याचा प्रयत्न करू. हा दौरा विश्वकरंडक स्पर्धेच्या तयारीसाठी चांगला होता.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details