मुंबई- बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन १४ दिवसांच्या आयसोलेशननंतर, अमेरिकेतील त्याच्या घरी परतला आहे. शाकिबने ढाकाहून अमेरिका असा प्रवास केला होता. यामुळे त्याला आयसोलेशनसाठी, एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. त्याने इन्स्टाग्राम अकाउंटवरुन पत्नी आणि मुलीचा फोटो शेअर केला आहे.
शाकिबने १२ डिसेंबर २०१२ला उम्मी अहमद हिच्याशी लग्न केले आहे. २०१५ला त्यांना एक मुलगी झाली. तिचे नाव अलायना हसन आहे. शाकिबने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरुन तो दुसऱ्यांदा बाप बनणार असल्याचे सांगितले आहे. तो त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी अमेरिकेला गेला होता. पण कोरोनामुळे त्याला १४ दिवस आयसोलेशनमध्ये राहावे लागले. यादरम्यान, त्याने पत्नी आणि मुलीपासून लांब रहावे लागत असल्याचे सांगत, मुलीचा फोटो शेअर केला होता.
शाकिबने घरी पोहोचल्यानंतर पत्नी उम्मीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. याशिवाय त्याने अलायना हिचा फोटोही शेअर केला आहे.