मुंबई - कोरोनाविरूद्धच्या लढाईसाठी अनेक नामवंत व्यक्तींनी पुढाकार घेतला आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने कोरोना व्हायरसशी लढा देण्यासाठी ५० लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. आता तो पाच हजार लोकांच्या मदतीसाठी पुढे सरसावला आहे.
तब्बल पाच हजार लोकांसाठी धावला सचिन! - सचिनची ५००० लोकांना मदत न्यूज
सचिनने शिवाजी नगर आणि गोवंडी परिसरातील लोकांना एका स्वयंसेवी संस्थेमार्फत महिनाभर मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी अपनालय नावाच्या संस्थेने सचिनचे आभार मानले.

सचिनने शिवाजी नगर आणि गोवंडी परिसरातील लोकांना एका स्वयंसेवी संस्थेमार्फत महिनाभर मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी अपनालय नावाच्या संस्थेने सचिनचे आभार मानले. अपनालयला मदत करण्यासाठी सचिन पुढे आला याबद्दल धन्यवाद. सचिन पाच हजार लोकांच्या राशनची जबाबदारी घेईल. असे बरेच लोक आहेत ज्यांना आपल्या समर्थनाची आवश्यकता आहे. दान करा, असे या संस्थेने ट्विटद्वारे म्हटले आहे.
सचिनने त्यांच्या बाजूने या स्वयंसेवी संस्थेला सेवा सुरू ठेवण्यासाठी प्रेरित केले. तो म्हणाला, "आपले चांगले कार्य चालू ठेवा." याआधी सचिनने पंतप्रधान केअर फंड आणि मुख्यमंत्री मदत निधीला प्रत्येकी २५ लाख रुपयांची मदत दिली आहे.